top of page

मी कृतार्थ आहे, या मातीतला!

Updated: May 9, 2021


धन्य आमुचे भाग...


सर्वप्रथम बाबा यशवंताच्या चरणी नतमस्तक होतो! अध्यात्मिक वारसासाठी मी नेहमीच बाबांचा ऋणी राहील. मित्रांनो मला आर. जी. डी. एन असल्याचा सार्थ अभिमान आहे आणि राहील. जेव्हा आपण फुलांचा हार बनवतो तेव्हा फक्त फुलेच महत्वाची नसतात तर त्यामध्ये वापरल्या जाणारा धागा आणि सुई सुद्धा तितकीच महत्त्वाची असतात. आणि हो, हार बनवणारा सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो, बरं का! आर. जी. डी. एन एक नातं आहे समजुतीचं, एक नातं आहे प्रेमाचं, एक नातं आहे विश्वासाचं. आर जी डी एन वेबसाईट लॉन्चिंग ही एक खूपच मस्त कॉन्सेप्ट आहे. गाव आणि समाज म्हटलं की प्रत्येकाला एक ऋण देनं लागतं. त्यासाठी जीवनात निरंतर आशावादी आणि सक्रीय राहणं महत्त्वाचं असतं. चांदस वाठोडा ही दोन नावे मला गावापेक्षाही सख्या भावाप्रमाणे वाटतात, जी इथल्या पिढीवर कला संस्कृतीचा वर्षाव करत राहते. मुळात रित्या पदरी इथे कोणी राहतच नाही.


आपल्या गावाची किमया खूप दूर पर्यंत पोचलेली आहे. . इथल्या प्रत्येक व्यक्तीला कला-संस्कृती जिद्द चिकाटी मेहनत इत्यादीचा वारसा मिळालेला आहे. म्हणूनच तर आपल्या सर्वांचा इतर शहरांमध्ये टिकाव लागतो. आणि म्हणूनच वारसातून मिळालेल्या कलेमध्ये आपण वाढ करायची असं मी ठरवलं. तसं पाहिलं तर माझ्या आई-वडिलांमध्ये कला या विषयासंदर्भात आवड होतीच. कॉलेजला असताना मित्रांनी मला सल्ला दिला की MFA साठी प्रयत्न कर म्हणजे कलेमध्ये आणखी यश आणि पूर्णत्व मिळेल. नृत्य, गायन आणि नंतर नाट्य अशा रीतीने माझा प्रवास सुरू झाला. एखाद्या खेळाप्रमाणे मी एक एक पाऊल पुढे जात राहिलो आणि मला माहिती मिळत गेली. M.F.A. संदर्भात बोलायचे झाल्यास ही एक पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोफेशनल डिग्री आहे. हे डिग्री घेण्यासाठी तुम्हाला आधी BFA करावे लागणार. MFA ही दोन वर्षांची तर BFA ही तीन वर्षांची स्नातक डिग्री आहे.


मित्रांनो, डॉक्टर इंजिनिअर शिवाय बरीच कोर्सेस आणि प्रोफेशन आहेत, जी तुमची वाट पाहत आहे. आपल्याकडे जे बेसिक आर्ट असेल मग ते काहीही असो तिला समोर नेता येणे हे खूप महत्त्वाचे आहे म्हणजे आपल्या आवडीनुसार आपण प्रोफेशन ठरवायचं आणि त्यात स्वतःला झोकायचं ही तयारी असेल तर यश तुमचेच आहे. कलेशी समरूप झालं की तानसेन घडतो, पंडित बिरजू महाराज घडतात, पंडित भीमसेन जोशी, एम एफ हुसेन, लता मंगेशकर उस्ताद झाकीर हुसेन ,उस्ताद बिसमिल्लाह खान इत्यादी कलाकारांचा जन्म होतो.



अपुऱ्या मार्गदर्शनामुळे आपली मोठी फसगत होते. MFA म्हणजे मास्टर ऑफ फाइन आर्ट म्हणजेच ललित कले मध्ये मास्टर होणे ज्यात दृक्(Visual), श्राव्य(Audio) व दृकश्राव्य(Audio-Visual) अशा तीन गोष्टींचा समावेश होत असतो. यात मुख्यत्वे व्हिज्युअल आर्ट्स, क्रिएटिव्ह रायटिंग, ग्राफिक डिझाइन, फोटोग्राफी, फिल्ममेकिंग, डान्स ड्रामा- थिएटर आणि इतर ललित कलांचा समावेश करण्यात आलेला आहे. बॅचलर ऑफ फाइन आर्ट ची डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही MFA करू शकणार,यात काही शंका नाही.


वर दिलेले कुठलयाही एका ललित कलेत तुम्हाला प्रवेश मिळू शकतो आणि हो ,एकावेळी एकच ललित कला तुम्हाला अभ्यासावी लागणार. ललित,लालित्य किंवा सौंदर्य ही सर्व एकाच अर्थाचे शब्द आहेत त्यांच्या आश्रयाने व्यक्त होणाऱ्या कलांना ललित कला असे म्हटले जाते. सौंदर्य आणि सुकुमारीतेची अपेक्षा आणि ज्या कला मुख्यत्वे मनोरंजनात्मक असेल ती कला म्हणजे ललित कला होय अशी सर्वसाधारणपणे आपण याची व्याख्या करू शकतो.



माझं आधीपासूनच नाट्य नृत्य गायन या विषयाकडे जातीने लक्ष होतं कुठलंही ग्रॅज्युएशन करून तुम्ही MFA ला प्रवेश घेऊ शकता मात्र नृत्य, अप्लाईड आर्ट फोटोग्राफी इतर सर्वच प्रवेशासाठी तुम्हाला त्या त्या क्षेत्रातील BFA करणे बंधनकारक आहे. जवळच असलेल्या नागपूर युनिव्हर्सिटी मध्ये हे काही कोर्सेस उपलब्ध आहे उर्वरित सर्व मुंबई-पुणे औरंगाबादला आहेतच. मुंबईचे J J ARTS COLLEGE एक उत्कृष्ठ महाविद्यालाय आहे, जेथे तुम्ही अनेक निषणांत आर्टिस्ट चे मार्गदर्शन घेऊ शकता. आधी डॉक्टर इंजिनिअर बनण्याची क्षमता नसलेले विद्यार्थी आयटीआय (तंत्रशिक्षण) कडे वयाचे जेणेकरून किमान कौशल्यावर आधारित असलेला कामधंदा त्यांना मिळत असे. अजूनही करतातच आहेत पण आता वाढत्या आधुनिकीकरणामुळे व वैश्विक करणामुळे जग जवळ आलेले आहे तेव्हा आजचा विद्यार्थी हा सुद्धा प्रगत झालेला आहे किंबहुना प्रगत व्हावंच लागेल. शहरातील तरुणांमध्ये अवेयरनेस असु शकते मात्र गावा खेड्यातील तरुणांना याची माहिती नसल्याने तो मागे राहतो किंवा वेळाने त्याच्या पदरी यश येतं.


दिलेल्या कुठल्याही एका कलेमध्ये आपण MFA किंवा BFA केलं तर आपण आपला व्यक्तिगत व्यवसाय सुरू करू शकतो मुख्यत्वे आपल्याला भ्रम, भीती, न्यूनगंड बाजूला ठेवून आणि धाडस ठेवून शहरात जाऊन त्या गोष्टी शिकाव्या लागणार तेव्हाच यश आपल्या वाट्याला येणार आणि नाट्य संस्कृतीचा वारसा भेटलेलं आपलं गाव आणखी पुढे जाणार आणि फिल्ममेकिंग, MPA, BPA (DANCE), ART DIRECTION EDITING ,CINEMATOGRAPHY इत्यादी कोर्सेस व डिग्री करून तुम्ही बॉलिवूड इंडस्ट्रीत सुद्धा प्रवेश करू शकता.



आता आपण गायन, वादन, नृत्य आणि नाट्याबद्दल बोलू या. बीपीए म्हणजे बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स. अमरावती युनिव्हर्सिटी मध्ये ही एक गायन, वादन, नृत्य, नाट्य इत्यादी विषयाची प्रोफेशनल डिग्री आहे. ही डिग्री पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बारावी पास होणे महत्त्वाचे आहे. 3 वर्षाचा हा डिग्री कोर्से पूर्ण करून तुम्ही कुठल्याही CBSE शाळेवर गायन, वादन, नृत्य, नाट्य शिक्षक म्हणून नौकरी करू शकता किंवा स्वतःचे क्लासेस सुरू करू शकता. वर्धा येथे सुद्धा या सर्व विषयांचा एक ग्रॅज्युएशन डिग्री कोर्स उपलब्ध आहे. दुसरीकडे गंधर्व मंडळाच्या परीक्षेची तयारी करून तुम्ही गायन वादन या विषयात विशारद, अलंकार पर्यंत मजल मारू शकता आणि शिक्षक म्हणून काम करू शकता.


मित्रांनो, पडद्यासमोर ची मंडळी तर आपल्याला दिसतेच मात्र पडद्यामागची मंडळी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्या सर्वांचे शिक्षण आहे. फक्त स्पॉटबॉय सोडला की सर्वच लोकांना एक शिस्तबद्ध ट्रेनिंग कोर्स/डिग्री पूर्ण करूनच इंडस्ट्रीत प्रवेश मिळतो तेव्हा हिंमत हारू नका प्रोफेशन निवडा आणि व्हा आरुढ टारगेटवर. इथपर्यंत पोचलेली आपल्या गावाची नाट्य संस्कृती तरुण वर्गामुळे आकाशात झेप घेऊ शकते आपल्या गावाचं नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचवण्याची जबाबदारी आता तुमची आमची सर्वांची आहे, तेव्हा लागा कामाला आणि जोपर्यंत ध्येय पूर्ण होणार नाही तोपर्यंत थांबू नका यासंदर्भात कुठलीही मदत लागली तर हमखास आपला समजून फोन व्हाट्सअप मेसेज करा.


 

श्री. कृष्णा धन्नालाल पाल

M.A. (ENG) B.Ed, MFA (Theatre), BPA (Dance),

SET (Eng), PhD in Eng. Lit. (APPLIED)


M.: 7057188185 | 9975698504

 

166 views0 comments
bottom of page