top of page

आदरणीय,
 

कै.श्रीमंत दानशूर रामराव उपाख्य दादासाहेब गणपतराव देशमुखांच्या ज्ञान पंढरीचे आपण सर्वजन वारकरी आहोतच. या ज्ञानगंगोत्रीचा ज्ञानरुपी आचमन आपण सर्वांनीच केले आहे. आपण सर्व आर.जी.देशमुख कृषि विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय बुनियादी बाल विद्यामंदिराचे विद्यार्थी म्हणून कृतार्थ आहोत.  आर.जी.देशमुख कृषि विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व बुनियादी बाल विद्यामंदिरातून विद्यार्जन करून प्रत्येकजन आपापल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे यात तिळमात्र शंका नाही. आपणा सर्वांच्या आपापल्या विविध खेत्रातील यशाचा दरवळ सर्वांनाच अनुभवता यावा किंबहुना त्या यशोगाथेचा परिचय सर्वश्रृत व्हावा ही आम्हा सर्वांची निर्मळ अपेक्षा आहे.
 

खडतर वाटेवरून चालल्याशिवाय व श्रम आणि शिकस्त यांच्या सातत्याशिवाय यशाच्या फळांची चव चाखता येत नाहीहे मात्र सत्य आहे. आपण आपल्या आयुष्यात यशाची शिखर गाठण्यासाठी अनुभवातून चोखाळलेले मार्ग आणि पेललेली आव्हाने हीच आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आणि यशोगाथा आहे. आपणा सर्वांचे अनुभव आमच्यासाठी प्रगल्भतेचा वारसा आहे.अर्थातच आपल्या व्यक्तिरेखा आपले अनुभव आणि मार्गदर्शन आपणा सर्वांच्या मागून येणार्या पिढ्यांना नवी क्षितीज कवेत घेण्यासाठी प्रेरक आहेत मार्गदर्शकही आहेत.

 

चांदस वाठोडा गाव सांस्कृतीचं आगर आहे. नाट्यकला,लोककला आणि परंपरा यांचा मनोवेधक मिलाप या गावांमध्ये सुंदर साधला गेला आहे. कोणतेही उत्सव कलाविष्काराने सादर करण्याची प्रथा अगदी निराळीच आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असणारे लोकं विद्येनं मात्र श्रीमंत आहेत. प्रबोधनाच्या चळवळी,स्वातंत्र्याच्या चळवळी आणि विद्यादानाची मांदियाळी पदरमोड करून जपली गेली हेच आमचं वैभव आहे. आजही नवीन पिढी उच्च शिक्षणाची वाट आर्थिक विषमतेवर मात करून चालताहेत हा आमचा अभिमान आणि स्वाभिमान आहे.परंपरेनं जपलेल्या कला आजची पिढी व्यवसायिक आणि सामाजिक भान जोपासून राबवत आहेत ही बाब स्वप्नरंजक नाही तर वास्तव आहे.

आपला गाव आपली अस्मिता आणि आपली भावना यांची वीण आहे. ही वीण आपला सामाजिक परिवार विस्तीर्ण करण्यासाठी भुरळ घालते. या विस्तीर्ण परिवाराचा सर्वसमावेशक परिचय एकाच केंद्रीत माध्यमातून साधता यावा हा छोटासा प्रयत्न आहे व तो आवश्यकही आहे. नोकरी, व्यवसाय व इतर माध्यमांमधून आपण सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी वावरत असलो तरी RGDIAN या नात्याने मात्र एकमेकांशी एक ऋणानुबांधाची विण आणखी दृढ आणि घट्ट व्हावी यासाठी RGDIAN ही वेबसाईड एक मध्यम म्हणून खास आपण सर्वांसाठी उपलब्ध करीत आहोत.

आपल्या क्षेत्राचे आपण निश्चित्तच उत्तम जाणकार आहात. तंत्र, कला, वाणिज्य, व्यवस्थापण किंवा मार्केटिंग असो या क्षेत्रातली भाऊगर्दी पाहता ग्रामीण भागातला विद्यार्थी आधीच हातपाय गाळून बसतो. स्पर्धा नावानेच अर्धा आत्मविश्वास वजा होतो. मग यशाची व्याख्या विसरून न्यूनगंड वाढतो. या सर्व समस्या आणि त्यावर आपल्या जवळ असलेला ज्ञानाचा उपयोग आणि मार्गदर्शन सूचक येणाऱ्या नव्या पिढ्यांना लाभाव्यात हीच प्रामाणिक इच्छा या वेबसाईडच्या निर्मिती मागे आहे.
 

आपणा सर्वांचे मार्गदर्शन सूचना व सहकार्यातून RGDIAN आपणा सर्वांना समर्पित करतांना कृतार्थ होत असल्याची भावना निशितच आहे. यापुढेही आपले विविधांगी मार्गदर्शन लाभेलच हीच कामना!    
 

 

आपला

About RGDian / 

Chandas  Wathoda

TQ: Warud, Dist: Amravati,

Maharastra (India) - 444906

E: info@rgdian.in | chandaswathoda@gmail.com

आपल्या प्रतिक्रिया स्वागताहार्य !

Thanks for submitting!

bottom of page