top of page

'दगड संशयाचा'



आशेच्या नऊ महिने आणि नऊ दिवसाच्या बहरलेल्या काळाने रूप घ्यावे ते असे, वादळ यावे पण थांबू नये, रीत आहे ती जगाची.

मग

उदारतेची ही थाप माझ्या पाठीला का नाही?

कुठंल्या तोंडाने पदरी सुख मागायचे,

ते हि तू केलेल्या तुझ्याचं उपकारांसाठी,नि पदरात न समावता येणाऱ्या सुखासाठी की आम्ही करायची ती फक्त नि फक्त तुझ्या चरित्र्याची जोपासना व घ्यावयाचें लोळण ते ही तुझ्या मन-तृप्तीसाठी, दारिद्रीच्या अंगणात आणि अंधश्रधेच्या चिखलात.

पाझर दिल्या त्या दगडाला आता शेंदूर लावावा हा फक्त चुकून झालेला गुन्हाचं मग तुझ्या अपेक्षा आम्ही दुधाने भागवायव्या हा कसला हट्टपणा?

आयुष्याच्या टोकावरती आता इथं पर्यंत पोहचवावे हेच तुझें वरदान, मग ईथुनही सगळं नशिबावर बघायचे हा कसला न्याय?

आयुष्य भर मी स्वतःला टोचत राहावे त्या एका क्षणासाठी, की द्यावा दोष तूझ्या जगाच्या परिपक्व रितीला जिथं अजूनही सोसतोय माणूस चटके लाचारीचे आणि दारिद्रीचे.

लाचारी सहन करुनही व्हावा उगम तो भुकेचा आणि अफाट अश्या विचारांचा,

पोटच्या काळजाची भूक भागवावी की करावी पूजा काळीज देणाऱ्या ईश्वराची जरी रोज मनात उगवावा सूर्य संशयाचा.

तरी ही तडफतड राहावे विश्वासाच्या काळ्या वनात तुझ्या उत्तराच्या तिरिपासाठी.


"अन्याय द्यावा पण आरोप नको."

तू तर दोन्ही पण दिलंस

आयुष्यभराच्या अंधारात दिवा द्यावा तो ही अंधाराचा

आवाज द्यावा पण ते बोलायचे सामर्थ्य कुठून आणावे.

तूच द्यावी कष्टेच्या वाटेला वळणे श्रद्धेची ,विश्वासाची मग

वाटेत संशयाचा आडवा आलेला साप कश्यासाठी?


युगाच्या रितीला तुही चुकला नाहीस विसरू नकोस,

ठोकरीने पायातुन रक्त यावे इतपत तुझ्या अपेक्षा पूर्ण केल्या

मग तोच दगड काळजाला जपून वागवेल ही एका आईशी वाणी,

दुधाचं नाही तर रक्ताने अभिषेक केला मग दूध ते बाळासाठी.


तुझ्याशी वैरी होऊन आनंदाने जगावे हे कधी कोणी शिकवलेच नाही, ठोकरीने माणूस स्वतः चालणं शिकतो मग

ह्याचा आधार मी बनू की तू?

जन्म फक्त सुन्न अश्या वादळाचाचं नाही तर झाला तो तुझ्यावर उठणाऱ्या नजरेचा, संशयाचा, माझ्या विश्वासाचा

आणि ह्या बाळाचा,


जो अजुनही बाळचं आहे.


-भाग्येश कडू


#म #मराठी #मराठीब्लॉग

41 views0 comments
bottom of page