top of page

श्री क्षेत्र मुसळखेडा

Updated: Sep 7, 2021


जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती |

देह कष्टविती परोपकारे ||



चांदस वाठोडा ही दोन्ही गावे पंचाक्रेषितच नव्हे तर विदर्भ प्रांतात संतभूमी म्हणून चिरपरिचित आहे.परमहंस यशवंत बाबांच्या पदस्पर्शाने इथल्या मातीत कण-कण पुणीत झाला आहे. चांदस जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असतांना परम पूज्य दै.ना.जिचकार उर्फ परदेशी यांच्या भक्तियोगाने यशवंत प्रभूंचे चांदस आणि वाठोडा गावात आगमन झाले.प्रसिध्दी ही तर संत आगमनाने होतेच परंतु या शिवारात जनमन चैतन्य स्वरूप झाले.


सन १९५० नागपंचमीच्या महुर्तावर आपला भक्तगण मुदीत करण्यासाठी शाश्वत चैतन्य ईश्वरानं भक्तोध्दारासाठी चांदस आणि वाठोड्यात आगमनभक्तांची केले.ना देहाची भ्रांत ना मोह ना माया पण मोहमयी जगाला अज्ञानाच्या अंध:कारातून,ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाट दाखविण्यासाठी यशवंत बाबाचे आगमन होते.सतत बारा वर्षे माहुली जहागीर येथे भाक्तोध्दाराचे निर्मोही कार्य करून प्रभू नव्या काजासाठी पुन्हा नव्या दिशेने निघाले.


वाठोडा येथे डॉ.ठाकरे यांचे खरडी नावाच्या शेतात(आताची यशवंत वाडी) भक्तांचे संकट निवारण्या झोपडी बांधून दरबार स्थापन केला. भक्तांची दु:ख संकट निर्दालन करण्यास अवतार यशवंताचा होता आणि आहे. चांदस आणि वाठोड्याच्या पंचक्रोशीत बाबांचे गाडी बैलाने भ्रमण सुरु असायचे आणि आजही हा परिसर त्यांचेच शाश्वत चैतन्यात आणि सूक्ष्म संरक्षणात आहे.अनेक रोगी आले रोगमुक्त होवून बाबांचे कृपा आणि आशीर्वाद अनुभवत आहेत.


यशवंत बाबा २० सप्टेंबर १९५५ ला भाद्रपत चतुर्थी गणेश स्थापनेच्या मुहूर्तावर समाधिस्त झाले.शरीर नाश्वर आहे.त्याचा त्याग करावा प्रभू स्वयं वरदा असतांना आपली लीला फक्त तेच जाणतात.यशवंत बाबा प्रत्यक्षात शरीरात असतांना भक्तांमध्ये त्यांचा वावर असतांना भक्तांना बोधवाले मात्र प्रभू समाधिस्त झाल्यावर आजही भक्तांना तसेच अनुभव येतात.हा अनुभव सर्वांचाच आहे आणि तो सर्वानुभूती आहे. बाबांची समाधी चांदस आणि वाठोडा या दोन्ही गावापासून दीड किलोमीटरवर मुसळखेडा या ठिकाणी आहे.

जहां संत की हो समाधी

निर्मल वही स्थान है |

पावन बने वातावरण

वहाँ शांती को आवाहन है |


परमहंस यशवंत बाबा समाधीमुळे चांदस वाठोडा आणि मुसळखेडा या गावांना आज देशभरात तीर्थक्षेत्र म्हणून ओळख,मान्यता आहे.श्री क्षेत्र मुसळखेडा येथे व श्री यशवंत वाडी येथे बाबांचा जन्मोत्सव सोहळा व समाधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. ज्यासी जैसा अनुभव,त्या तैसा पावे देवा | बाबा समाधिस्त असतांनाही अनेक भक्तांनी आपला काळ लावून पहिला सर्वांनाच प्रचीती आणि अनुभव आपलाच.चांदस वाठोडा वासियांनी यशवंत लीला तर प्रत्यक्ष याची देही याची डोळा अनुभवल्या,इथले चराचर श्री यशवंत कृपेने पावन झाले.



आज लाखोंच्या संख्येत श्री चे भक्त मुसळखेडा आणि वाठोडा दरबारात येवूनी समाधी दर्शनाचा लाभ घेत आहेत.अध्यात्म,कला,संस्कृती आणि अध्ययन-अध्यापन (शिक्षण) यांचा मिलाप म्हणून चांदस आणि वाठोडा गावांची अनोखी ओळख चिरपरिचित होत आहे.


असे धोत्ररखेडा परिपुण्यभूमि

जिथे जन्मले श्री यशवंत स्वामी ||

असे गाव तो एक विदर्भ प्रांत

नमस्कार माझा प्रभू यशवंता ||

 

लेखन: अमरदिप खाडे

 

Chandas | Wathoda | Musalkheda | Yashvant baba | Yashvant Wadi

206 views0 comments
bottom of page