top of page

" पिरकी"
आयुष्यभर वादळातल्या विझत्या दिव्याच्या ज्योतीला सहानुभूतीच्या घेरा द्यावा जेणेकरून ती फक्त विझू नये, स्वतःच्या वाटेवर येणाऱ्या अंधाराचा विचार न करता ,कसले हे सामर्थ्य की आहे फक्त आयुष्य टिकवण्याची न संपणारी झुंज.


अंधकारात सातत्याने कोसत असलेल्या त्या निरागस तिरिपाची ही अडखडती व्यथा , लडखडत फक्त त्याने आधाराने जगावे, ते ही फक्त दुसऱ्याच्या हितासाठी की घ्यावा त्याने त्याचा घात फक्त अंधारात अंधार करण्यासाठी. ठिणग्याचा विशाल वणवा करणाऱ्या इतपत ह्या वादळाला आशय कोणी दयावा तोही मायेचा, प्रेमाचा आणि जगापासून वेगळ्या त्या समजूतदारपणाचा आणि जपावा तो फक्त नि फक्त आयुष्यभर स्वतःच्या मनात दडलेल्या लोभासाठी, मनोरंजनासाठी आणि मनातल्या भोळ्या बालपणासाठी. आणि करावा त्याचा महोत्सव दिवाळीचा आणि होळीचा.


जपावे ते घराच्या त्या कोपऱ्यात तिथे वादळाचा अंश ही नसेल , नाहीतर सोडून द्यावे त्या काठावर जिथे वृंदावन पासून दिसेल वाटा बाहेरच्या सृष्टीच्या मन मोकळ्या आणि जगणे शिकवणाऱ्या अनुभवाच्या. की कोंडून द्यावे बिना आशेने एका काचेच्या महालात,शोभेसाठी.

मग स्वतः जळून जळून द्यावा त्या काचेला तडा त्या होणाऱ्या अन्यायाचा, वर्चस्वाच्या आणि गुलामगिरीचा.

फुंकर ने विझवता यावे इतपत ह्याचे सामर्थ्य आणि तुम्ही द्याल तेवढ्या तेलावर ह्याचे आयुष्य ,मग का ही अवेहलना फक्त आणि फक्त अपुल्या गरजेसाठी,की भडका उठेल ह्याचा भीतीसाठी.

कसले हे सोंग की आहे फक्त एक मामुली कथा

त्यानेही तरी कुठे जावे, अंधारातचं त्याला आयुष्य मिळावं हीच त्यांची माता मग नाही का करावा त्याने त्याचा आत्मघात त्याच मायेसाठी ,प्रेमासाठी.


शेवटी अंगार झाली ती हातालाच, त्याच्याचं बुडातील तेल लावून त्यानीचं शांत करावी ही आग , मायेची व त्या प्रेमाची.


-भाग्येश कडू


#म #मराठी #मराठीकट्टा #marathiblog #blogger #bhagyesh #blogpost

17 views1 comment
bottom of page