शब्दांकन - श्री उमेश कडु
1965 च्या भारत पाकिस्थान युद्धातील युद्धकैदी म्हणून तुरुंगवास भोगणारे श्री.विष्णुपंत पाटनकर काळाच्या पडदयाआड..........चांदस वाठोड्याच्या भूमीत जन्माला येणारे श्री.विष्णुपंत पाटणकर वाठोडा येथील कृषक समाजातील पाटणकर घराण्यात जन्माला आले.पाटणकर घराण्याची परिस्थिती तशी बिकटच होती.शेतावरील उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह असायचा.कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असतानाही शिक्षणाची आवड असणारे श्री.विष्णुपंत पाटणकर शाळेत जाण्यासाठी आग्रही असायचे.अगदी पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा चांदस येथे गुरुवर्य दौ. ना.जिचकार गुरुजी, एन.डी. देशमुख गुरुजी तसेच एम.टी. देशमुख गुरुजी यांच्या मार्गदर्शनात पूर्ण झाल.त्यानंतरच आठवी पासूनच शिक्षण वरुड येथे झालं, त्यानंतरचं 9 वी,10 वी पर्यंतच शिक्षण अमरावती येथील शिवाजी हायस्कुल येथे पूर्ण झालं.मॅट्रिकच्या शिक्षणाबरोबरच एन.सी.सी.च्या अभ्यासक्रमाची तयारी ठेवत 'युद्धात सैनिक' म्हणून स्वप्ने रंगवण्यास सुरवात झाली.गुरुवर्य दौ.ना.जिचकार गुरुजी यांच्या संस्कारात वाढल्यामुळे कर्तव्य,शिस्त आणि धर्मिकता यांची मनावर पकड बसली.सैनिक होण्याची स्वप्ने रंगवत असताना विध्यार्थीदशेतच सैनिक होण्यासाठी पूर्वतयारी सुरु झाली. 1952 साली भारतीय सैनिकात निवड जबलपूर येथे झाली. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि समाजिक कार्याची आवड जोपासणारे श्री.विष्णुपंत पाटणकर यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन युद्धातील परिस्थितीची माहिती संदेशवहणाद्वारे ' हेड कार्टर' ला पोहचवण्याची प्रमुख जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली.
1965 च्या भारत पाकिस्थान युद्धात सहभागी होण्यासाठी पावणे दोन वर्षाच्या मुलाला आणि कुटुंबाला सोडून युद्धात कर्तव्य बजावताना मनातील सहजता वाखानन्याजोगी होती.युद्धात दिलेली कामगिरी आपल्या बौद्धिक क्षमतेवर आधारित असून कामागिरी बजावताना कसूर होणार नाही याकडे कटाक्ष होताच.संदेशवहानाची जबाबदारी हेड कार्टरला पोहचवताना जोखीम होतीच पण संभाव्य धोका टाळता यावा यासाठी देशप्रेम ओतप्रत होत हे सुद्धा आवर्जून सांगावसं वाटते. युद्ध सुरु असताना रात्रीच्या दोन च्या सुमारास बिन तारेच्या संदेशवहनातून हेड ऑफिस ला महत्वपूर्ण माहिती देतांना श्री.विष्णुपंत पाटणकर आणि इतर 34 भारतीय जवानांना युद्धात पाकिस्थानच्या सैन्यांनी पकडलं आणि कैदेत टाकलं.तुरुंगात त्या संपूर्ण 35 जवाणांचा अमानुष छळ करण्यात आला.(35 जवानांपैकी श्री.विष्णुपंत पाटणकर आणि एक जवान सोडून बाकी स्वयंपाकी,न्हावी, सफाई कामगार, वाहन चालक आणि इतर होते. )युद्धात झालेल्या झटापटीत श्री.विष्णुजी पाटणकर यांच्या पायाला 2 गोळ्या लागल्यामुळेच ते पाकिस्तानी सैनिकांच्या हाती सापडले होते.प्रत्येक दिवस त्यांच्याकरिता काळरात्र ठरावी असाच होता,त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळावी यासाठी पाकिस्तानी लष्कर अमानवीय छळणूक करायचे, असंख्य वेदनांनी सहन करावा लागणारा छळ जीवघेण्यासारखा वाटायचा .युद्ध संपल्यानंतर श्री.विष्णुजी पाटणकर युद्धात शहिद झाले असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता परंतु काही दिवसानंतर मायदेशी पाठवलेल्या पत्रानुसार पुन्हा भारतीयाच्या आशा पल्लवीत झाल्या.
श्री.विष्णुजी पाटणकर जिवंत आहेत याचा आनंद पाटणकर परिवारात मावेनासा झाला,मायदेशी श्री.विष्णुजी पाटणकर यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर इंग्रजीत असायला हवं अशी अट पाकिस्थानी लष्कराकडून घालण्यात आली,त्यामुळे पाठवलेल्या पत्राला उत्तर देतांना कुटुंबियांनी आर.जी.देशमुख कृषी विद्यालयातील इंग्रजीचे गाढे अभ्यासक श्री.र.वा.खाडेसर आणि स्व.श्री.म.ना.वानखडेसर यांची मदत घेतली. एकंदरीत साडेपाच महिने हा तुरुंगवास पाकिस्तानात भोगावा लागला, परंतू त्याच दरम्यान पाकिस्थानचे 5 जवान भारतीय लष्कराच्या ताब्यात सापडले,त्यामुळे भारत आणि पाकिस्थान यांच्यात झालेल्या करारात भारताच्या 7 जवानांच्या बदल्यात 1 पाकिस्तानचा जवान सोडायचा असा तह ठरला आणि युद्धात 35 भारतीय सैनिकांची अश्या प्रकारे सुटका करण्यात आली.मायदेशी परतल्यानंतर मातीचा टीळा कपाळावर लावताना डोळ्यातील आसावांच्या रूपान देशप्रेम सहज व्यक्त झालं.पुढे जन्मभूमीत परतल्यानंतर गावकऱ्यांनी प्रत्येक चौकात सत्कार घेतला.
त्यानंतर गावातील गर्भश्रीमंत विठ्ठलराव उपाख्य बाबासाहेब देशमुख यांच्या वाड्यात समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार घेण्यात आला.व्यासपीठावरील उपस्थितीत सर्व मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर श्री.विष्णुजी पाटणकर यांनी पाकिस्थानात युद्धकैदी असतानाची आपबिती भाषणातून सांगितली.1965 भारत पाक युद्धात युद्धकैदी असतानाचा थरारक प्रसंग सांगताना प्रत्येक गावकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं.हा क्षण अभूतपूर्ण आणि देशप्रेम व्यक्त करणारा ठरला.श्री.विष्णुजी पाटणकर आणि सहकाऱ्यांनी दाखवलेल्या अदम्य शौर्याबद्दल भारत सरकारने त्यांना सन्मानित केल, आजही अनेक समज सुधारक संघटनांनी त्यांच्या शौर्यासाठी त्यांना सन्मानित केलं आणी करतच आहे.
आर.जी.देशमुख कृषी विद्यालयाचे शिक्षक श्री.प्रफुल्ल भुजाडेसर यांनी आर.जी.डियन ग्रुपद्वारे घेतलेली मुलाखत अतिशय भावुक आणि प्रेरणादायी आहे.त्यांच्या जीवनपटाचे यथार्थ दर्शन मुलाखतीतून पाहायला मिळते. वयाच्या 91 व्या वर्षी असतानाच म्हणजेच काल दि. 18 एप्रिल 2024 ला रात्री 11.30 वाजता श्री.विष्णुजी पाटणकर यांना देवाज्ञा झाली.आज त्यांच्या पार्थिवावर वरुड येथील मोक्षधाम येथे हजारोंच्या संख्येत शासकीय इतमानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अश्क बनकर झलकती रही मिट्टी मेरी,
छोले कुछ युही उगलती रही मिट्टी मेरी,
और मै जहा भी रहा साथ ना छोडा उसने मिट्टी मेरी,
और जहन मे मेरे महाकती रही मिट्टी मेरी...
या गझलच्या ओळीप्रमाणे जीवन सर्वस्वी अर्पण करणारे श्री.विष्णुजी पाटणकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली,संपूर्ण पाटणकर कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. पुनःच्च एकदा स्व.विष्णुजी पाटणकर यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद 🙏🙏💐💐🪔
शब्दांकन - श्री उमेश कडु
Comments