top of page

गजलकार लक्ष्मण जेवणे

इतुकीच एक इच्छा उरली मनात आता...

लक्ष्मण जेवणे यांची ग़ज़ल आणि ग़ज़लनवाज पंडित भीमराव पांचाळे यांचे स्वर...

ग़ज़ल सागर प्रतिष्ठाण मुंबईचे आयोजन...


(Credit: Vidyanand Hadke)
 

लक्ष्मण जेवणे यांना गझलमित्र परिवाराकडून आदरांजली !


गझल क्षेत्रातला तारा निखळला... लक्ष्मण जेवणे भाऊतुम्ही गेलात..हे मन मानायला तयार नाही.जेवणे भाऊ गझलेचे सच्चे निस्सिम वारकरी.कलावंत म्हणून जितके मोठे तितकेच माणूस म्हणूनही सर्वांगसुंदर व्यक्तिमत्व..गेल्या बारा वर्षाचा काळात..त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.गझल क्षेत्रात मोठे काम करूनही प्रसिद्धि पासून दूर राहायचे.नाव मिळवण्यासाठी खटाटोप कधी केली नाही .जे काम करायचे ते अगदी झोकून मनापासून करायचे .कधी रागावतांना पाहिलं नाही..कुणी कौतुक केल तर त्याला पचवायचे चुका मोठ्यामनानं स्विकारायचे..उपदेश करण्यापेक्षा ते मार्गदर्शक भुमिकेत नेहमी राहणे पसंद करायचे..त्यांच नसण अजुनही जाणिवेत उतरलं नाही. गझलसाठी आपले अख्खे आयुष्य वेचले.


एवढ समर्पण करणारा माणूस मी पाहिला नाही.भीमराव दादा पांचाळे..यांच्या गझल चळवळीतल्या कित्येक कार्यशाळेत ते मार्गदर्शन करायचे.आज गझल चळवळीच त्यांच्या जाण्यान मोठे नुकसान झाले.कित्येक बैठकी..कित्येक मैफिली..सोबत केलेला प्रवास..सारंकाही आठवलं की त्यांच्या नसण्यानं अंगावर शरारे येतात..गझलेतला एक ध्रुवतारा..गझल रुपाने आपल्यात सदैव तेवत राहील..

खूप घाई केली भाऊ...

भावपुर्ण श्रद्धांजलि...


 


18 views0 comments

Comments


bottom of page