top of page

त्रिज्या

Updated: Oct 23, 2022

चाकाच्या भोवताल आरे असतात, चाकाचा एक टोक वरती, दुसरा जोडल्या जाते मधल्या टोकाला. कायमचं फिरत बिचार एक आरा वरती तर दुसरा खालती दुसरा खालती तर पहिला वरती, कायम चालत. एक मेकांच्या आधारानं. मग आपला आधार बनेल असा केंद्रबिंदू कुठला तो सुखानी शोधावा की दुसऱ्याचा दुःखापेक्षा आपलं दुःख कमी ह्याच्या आधाराने. ह्या जाणीवेने मात्र माणूस जगतो, नी शोधतो तो जीवन जगण्याचं मूल्य.


बदनामीचा ठिगळ लावावं आणि आयुष्य भर त्याची ओल्ल्या जखमेसारख पूजा करावी चांगले कृत्य करून. सुधारावं लागत स्वतः ला नवीन उगवत्या सूर्याच्या चालीरीतीप्रमाने, उलट सुलट कुणाचं सुख-दुःख, पाप- पुण्य, करणी- भरणी कायबी मोजता येत नाही स्वतःची भूमिका स्वतःचं पार पाडायची, कश्यात कमी राहून चालत नाही.

जमान्या सारखं वागायचं, बस म्हठल्या म्हणून बसायचं. कुणाच्या विनोदवर हसायचं तर कुणाच्या दुःखावर रडायचं हे पण आधीच ठरवून दिलंय. भावनाना कदर मिळेल जेव्हा दुसऱ्याचा भावनांना तु जपशील. दगडाच्या देवावर डोकं आदळला की स्वतः ला दुःख होन साहजिकच मग त्याचं निदान सुद्धा त्या दगडाच्या देवाला मागण्याचं सामर्थ पण असावं ही मात्र हार की स्वतःचा नाईलाज.

काय बी करून चालत नाही जगाला मान्य असेल तरच ते बरोबर. दुःख विसरायला कुठं जायचं इतपत ह्या आयुष्याचं कुतूहल. जिथं पण गेलो तिथं तिथं आपल सुख तर दुसऱ्याचं दुःख.


अजूनही दडलाय जीव गावाकडील नदी काठच्या दगडा मध्ये. वादळं,पुर,उन, वारा बरसात कसला त्यावर परिणाम नाही.

पण त्याचा आधार म्हणून कित्येक जण बसतात त्याच्या जवळ आप-आपल्या जीवनाच्या गाथा सांगत. तो वेढब, कुरूप, काळा बसलाय वर्षांनी वर्ष दुःखाची फटके खात. त्याला परत अजून दुःखाच्या फटक्यानी बोठड करन कसली हुशारपणा. जवळून जाणाऱ्या झऱ्याला आपल दुःख सांगितली तरी तो वाहत जाउन कुठेतरी किनारी नेऊन टाकतो. पण मला दुःख मात्र त्या निर्जीव दगडाचं.

माहेर कुठल तेच कळत नाही. कटकट झाली की वाटतं सगळ सारखंच. घड्याललाची काटे मात्र फिरतात थांबत नाही. आठवणींची मजा घेत नाही. दुःखाचा काळ मात्र विसरायला होत नाहीं आणि आगाह करतात उद्याच्या त्याचं वेळेची आणि काही नं करू शकणाऱ्या त्या परिस्तिथीची.

जबाबदारीने जखडलेल्या जात्यात कसल दळण दळाव ह्याचा विचार जरी केला तरी त्याच्या किर किर आवाजान झोप लागत नाही.. काळया रात्री साथ म्हणून जगावं लागत त्या दिव्या ला त्याच्या बलिदान देऊन एका काळया गंजलेल्या कोनड्यात जिथे कित्येकांना सूर्य उगवताच जीव सोडला.भयाण अशी शांतता नी किरर असा येणार तो आवाज, दिव्याभोवती फिरणारे ते कीटक ज्योती भोवती फिरतात नी मरून तिथंच राख होतात. ज्योत हलली की हलतात पूर्ण भिंती वरच्या त्या काळया रंगाच्या सावल्या. मग अजून भयान वाटतं सगळं . त्या परवण्यानचं (किटकांच). पण स्वतःच अस्थित्व समजलंय त्यांना, मला नाही ह्याची खंत.

त्या दिव्याच अस्तित्व दिवस उजळे पर्येत मग भयाण रात्रीच्या स्मृतीचा त्याग देऊन परत दुसऱ्या दिवशी नवीन शर्यतीत तैयार राहायचं हा त्याच्या त्रिजेचा जीवन काळ. मग त्याची तयारी पण आपणच करायची, आताच.

सगळ्याची एक मर्यादा आणि एकचं काम ते पण ठरवून दिलेला.ना तळ्यात नी मळ्यात .

मग फक्त फिरत राहायचं घड्याळाच्या काट्या प्रमाणे सारखंच. एकाचं त्रिज्येत हसत-खेळत.


- भाग्येश कडू.


#म #मराठी #त्रिज्या #radius #akshayindikar #मराठीसाहित्य #ब्लॉग


24 views0 comments

Comments


bottom of page