top of page

चांदस वाठोडा ग्रामातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक: अल्प परिचय

Updated: Jan 12, 2021

ग्राम चैतन्य स्वातंत्र्य क्रांती देवताभ्यो नम: | क्रांती उठाव - १६ ऑगष्ट १९४२
१) भागवत राघोजी कनाठे:


चांदस, (जन्म २०.१२.१९१४ मृत्यू ४.१०.१९८७) वय २१

कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्म. शिक्षण मराठी चवथी इयत्ता पास. छंद - आखाड्यात व्यायामाची प्रात्याक्षिके करणे, शिकारीची नेमबाजी करणे. स्वभाव - हुडपणा तथा विघायक कामात तथा नाटकात काम करून लोक शिक्षणासाठी लोक करमणुकीसाठी संधी देणे. अंग मेहनतीची कामे करणे. उदाहरणार्थ विहिरीसाठी गोटे काढणे, फोडणे, विहिरी खोदणे, सार्वजनिक कामात शक्‍ती प्रदर्शनासाठी सहज चेतना घेऊन स्वतःला झोकून घेणे. १९४२ च्या चळवळीत त्यांचा सहभाग सत्याग्रहीचे बळ वाढविणारा वाटे.


 

२) महादेव शामराव देशमुख:


चांदस, (मृत्यू १७.९.२००४)

गरीब कष्टकरी - कामकरी कुटुंबात जन्म, शेती नाही. शिक्षण मराठी चवथी इयत्ता पास- छंद - - सार्वजनिक विधायक कामात स्वयं स्फूर्तीने भाग घेणे स्वभाव - नविन काही तरी शिकण्याचा व लोकोपयोगी कामात उडी घेण्याचा नाद. कष्टाचे अंगमेहनतीची कामे करणे. नेहमी सुसंगतीत राहून प्रगतीचा मार्ग शोधणे. पुढे पुढे प्रा.पं. प्यून पासून नोकरीत प्रवेश घेऊन अनुभवाने ग्राम सहाय्यक पदावर नोकरी व प्रवेश व सेवानिवृत्त झाले.

(१९४२ च्या आंदोलनात स्वतःचे जीवाला धोका पत्करून दुसऱ्या सत्याग्रहीला जीवदान देण्याचे असीम साहस केले. त्यात स्वतःचे डोके वाठोडा पाटलाचे सोट्याने फुटले होते. त्यामुळे तो लढा रक्‍तरंजित ठरला.)


 

३) विठ्ठल गणपतराव देशमुख:


चांदस , (जन्म ५.१०.१९२४ मृत्यू २७.३.१९५३) सत्याग्रहात वय १८ वर्ष

शेतकरी बापाचा एकुलता एक मुलगा. सुस्वभावी यामुळे सर्वांचा गावात लाडका. मराठी सातवी

इयत्ता पास. विविध क्षेत्रात, विधायक कामात, नाटक, भजनमंडळ यात गावात त्यांचे वाचून पान हालत नसे. कापूसॉ धंद्यात अगदी छोट्या पदापासून पाय ठेवला. अंती उत्तरोत्तर प्रगतीने बिबिध कापूस कंपन्यांचे एजंट म्हणून भारतभर भ्रमण केले. लोकसेवेची गावासाठी दृष्ट लागेल अशी विविध कामे केलीत. त्याच्या प्रेमळ स्वभावाने ते ज्याला त्याला हवेहवेसे वाटे. सत्याग्रहींना पकडून नेले तेव्हा पाय सुजून अंथरूणावर खिळले होते. तरी सत्याग्रहीबरोबर त्यांना तुरूंगात नेले होते. त्यांनी अल्पायुष्यात गावात-भागात केलेल्या उत्तुंग जनहिताच्या कामास तोड नाही. ते बयाच्या अवघ्या एकोणतिसाव्या वर्षी (१९५३) ला मरण पावले.


 

४) कृष्णा शामराव देशमुख;


चांदस (सत्याग्रही वयाचे १८ व्या वर्षी)

शेतकरी कुटुंबात वाढले. शिक्षण खंड पडून सातवी इयत्ता पास 'गरीब असावे पण लाचार नसावे' न अशी कडक शिस्त बापाची असल्याने त्या झळीतील डा स्वाभिमान जोपासून आपलं व्यक्तिमत्त्व घडवलं. छंद गायन, भजन यात रस. प्रामाणिकपणे स्वकुटुंबियासाठी व मदतगार म्हणून सहवासातील दुसऱ्यासाठी झटणे. सार्वजनिक कामाची, नाटक, व्यायाम याची आवड. कापूस धंद्यात लहान नोकरीपासून प्रारंभ. पुढे अधिकाधिक प्रगती. त्यापायी भारतभर भ्रमण. धंद्यामुळे संबंधित भाषा ज्ञान वाढवले. संघटनकौशल्य फार. गांधीवादी विचारसरणीचा त्यांच्या दैनंदिन दिनचर्येवर प्रभाव. सुत कताई, प्रात: योगासन. स्वतः कातलेल्या सुतांचे कपडे वापरणे यावर कटाक्ष. सध्या नागपुरला वास्तव्य. नागपुरात अनेक लोकसेवी संस्थांशी नाते. सच्छिलतेवर आजीवन भर देत आहेत.


 

५) बळीराम गणपतपराव उपासे:


चांदस, सत्याग्रहात भाग घेतला त्यावेळी वय २९ वर्ष,

गरीब शेतकरी कुटुंबात चांदस येथे जन्म. शिक्षण कष्टाने सातवी इयत्ता पास. उभ जीवन सुस्वभावाने दुसर्‍याचे पोटात धसून राहण्यात गेले, आई बालपणी निवर्तली, येईल ते कष्ट करून कष्टाळूपणा हा त्यांच्या जीवनातला अविभक्त भाग, सार्वजनिक व विधायळ कायात धडाडीने उडी. भरतनिष्ट बंधुता आणि दुसर्‍याचे परमाणू तुल्य गण मेरूपरि वाणण्याचा स्वभाव. अनेकांना उच्नेजन देऊन नाटक, कवायती, सेवाश्रमी ग्राम सफाई, सूतकताई तथा गावात नवचैतन्य खेळवण्यास हातखंडा म्हणून पुढाकार प्रामुख्याने यांचेकडे येई. ते या सत्याग्रही चळवळीचे सूत्रधार. कापूस धंद्यास प्रवेश. त्यात अलौकिक अशी प्रगती. सत्याग्रहातील लढ्यात गोर्‍या धार्जिण्यांच्या काठीच्या कसेळ्र बसलेल्या माराने ते दुखणे त्यांना प्रसाद ठरले. गावाच्या भरभराठीसाठी तळमळ उत्तर आयुष्य वरूडला स्थायिक. सेवावृत्तीचा ध्यास त्यातच अंत.


 

6) रामभाऊ लक्ष्मणसा खंडेतोड:


चांदस, (जन्म - ४.५.१९१९) सत्याग्रहात भाग घेतला त्यावेळी वय अवघे २५ वर्ष.

शिक्षण मराठी सातवी इबत्ता पास. आई-वडील तीन भाऊ. अविश्रांत श्रम-अविरत उद्यम हा त्यांच्या कुटुंबातील खरा मंत्र होता. परिश्रमाने त्यांच्या 9 कुटुंबाने टाकाऊ जागेवर उभारलेले घर खऱ्या चिकाटीचे प्रतिक. अशी चिकाटी रामभाऊचे अंगी भिनली होती. कमडे शिवण्याचा व्यवसाय निवडून त्यात प्रगती. त्यात हळूहळू कापड दुकान - ल्ोळ संपर्कात लोकांच्या अडीअडचणीत मदतीचा हात देण्याची वृत्ती. भोवतालच्या मित्र वलयाच्या सहवासाने भारावल्या जाण्याने विधायक कामात, सार्वजनिक कामात निष्ठापूर्वक भाग घेणे. ओघाने अंगी बाणल्या गेले. भावात सर्वात धाकटे असल्याने घरच्या सर्वांचा लोभ. त्यामुळे गावात विविध चळवळीत भाग घेण्यासाठी मुक्त संचार त्यांना होता. उद्यमशिलता, काटकसर, हिशेबी वनेमस्तपणा हे त्यांच्या प्रगतीचे अंग. आज उत्तर आयुष्यात शरीर थकले पण मन प्रसन्न ठेवून जिवनानंद घेत आहेत.


 

७) रामकृष्ण नरहर देव


वाठोडा, सत्याग्रहात भाग घेताना वय २४,

पास ७ वा वर्ग वडिलांचा शिक्षक पेशाचा वारसा होता. बापांचे सुसंस्कार असल्याने आपल्यापेक्षा गुणी लोकांचा सहवास असावा ही प्रबळ इच्छा होती. खेळाडू वृत्तीने ते सर्वांना हवेहवेसे वाटे. त्यांच्या स्वभावात स्तुतीखोरी नसल्याने त्यांचा मानोपणा व स्पष्टवक्तेपणा त्यांचा भोवला. स्वातंत्र्य चळवळीचे त्यांचे विचार होते. ते तशा बातावरणात रहात. पण गावातील इंग्रजधार्जिण्यांची वक्रदृष्टी त्यांच्यावर फिरल्याने सत्याग्रही म्हणून बळी दिला. वास्तविक इतर लोकाप्रमाणे जसे गावात इतर होते तसे ते होते. विचार सत्याग्रहींना पुरक होते. शेवटी शरीर थकल्याने ते मरण पावले.


 

८) अमृत रामाजी चोबितकर


चांदस, (जन्म ११.१.१८९६ मृत्यू ३१.१२.१९७८) सत्याग्रहात भाग वय ४१ शिक्षण

जेमतेम मराठी चवथी इयत्ता पास. शेतकरी कष्टकरी जीवन. हाडाचे शेतकरी. उत्तम प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी पण स्वभावाने हट्टी व स्वतंत्र विचारसरणीच्या बाण्याचे होते. त्यामुळे हुकमी होयबा बनणे त्याच्या गावी नव्हते. त्यामुळे सरंजामशाहीच्या विचाराशी त्यांचे बावडे होते. म्हणून असे

इंग्रज धार्जिणे मातब्बर लोक त्यांचा राग करी.

सत्याग्रहाचे वेळी सत्याग्रहींनी पटवारी दप्तराची मागणी केल्यावर ते खोटे कागदपत्र दिल्याने वाठोडा वाड्यावर गर्जून तें उद्गारले होते. कागदपत्र न दिल्यास वाड्यावर सत्याग्रह होईल या गर्जनेने त्यांचे नावावर इंग्रजपिटूंनी सत्याग्रही म्हणून शिक्का मारला. त्यांना विधोयक कामाची आवड व खादीचे कपडे वापरण्याचा छंद होता. ते वाठोडा येथे राहून म्हातारपणाने मेले.


 

९) मारूती बाबू दळवेकर


वाठोडा, सत्याग्रहात वय २९ वर्ष.

जेमतेम मराठी चौथा वर्ग पास. छंद आखाडा - दंडबैठका करून पहेलवान बनण्याचा शौक. स्वभाव - मानी, मोडेन पण वाकणार नाही असा. वाठोड्यात रहाणे पण सरंजामशाहीचा वचक खपवून न घेण्याच्या गुणाने. चांदसला अधिक उठबस असे. तिथे त्यांचे अधिक सूत असायचे. डोक्यावरील तिरळी टोपी, चालण्यातील अक्कड त्यांच्या निधडेपणाची निर्भीडपणाची द्योतक होती. हूडपणा त्यांनी जोपासला होता.

चांदसहून सत्याग्रहींची मिरवणूक नदी पात्रात रेतीत आली त्यावेळी चांदसला हजामतीचेसाठी जाणे सोडून देऊन सारी गुरे, सरकारी पडीतात ज्वारी पेरली होती त्या पाटलाच्या कृतीचा सूड घेण्यास गोधन हाकलण्यास सत्याग्रहींना या बहादूराने मदत केली. तोच बिचार्‍्याचा गुन्हा ठरला होता. स्वातंत्र्य लढ्यानंतर काही काळात तो मरण पावला. स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या पेन्शनचे दर्शन त्यास झाले नाही.


 

26 views0 comments

Comments


bottom of page