मी कृष्ण ना कुळाचा ना वंशाचा, सूर्य यदुवंशाच्या अस्ताचां. मृगवर्णीय मी अविनाशी या जगाचा, प्रपंच रचला मी माझ्याच कस्तुरीचा. यज्ञात जाळली आहुती सगळ्या पाप-पुण्याची, वेदी झाली शांत द्रुपदाची. मग वीज कडकडली देवांची, जन्मली ज्योत आर्यवर्षातील अंधाराची.
झाली नग्न ती तर पाहिले मीही , मलिन झाली राज्यसभा नि तीही. थेंब मी त्या द्रौपदीच्या डोळ्याचा, दिला रंग मी त्याला लाल प्रतिशोधाचा.
यज्ञसेनी मी द्रौपदी कुलवधू कुरुवशांची, होती जीवनाची ज्योत पाच आर्यांची. मी आग आता त्या आदिवासींच्या चुल्यातील प्रतिशोधाची, ज्याने जळणार सगळं कुरुवंश राखेशी.
मी एक नि मीच अनेक, आत्म्याला जुळणारी जन्माची धागे ही अनेक, धागा रथाचा नि सारथी व्यथेचा, वळणार चाक माझ्या वाटेला, रचेता मी या कथेचा.
वचने, शाप ,वर ह्यांचा खेळ हा निराळा सगळं काही माझ्यात समावेल काळ ही माझ्यात मिळाला. लिहिले हे सगळे मीचं आयुष्यात माझ्या टोचतील बाण हृदयाच्या भात्यात महाभारतात माझ्याचं.
Comments