कर्तव्यांची परतफेड उपकाराचे हात देऊन करावी फक्त खांद्यावर असलेलं परावलंबनाचं ओझं हलकं करण्यासाठी, आणि परंपरेला मात देण्यासाठी.
ऋषीमुनींनी भटकट रहावे उन्हां-तान्हात आयुष्याची भूक भागवत ह्या दारात त्या दारात, सगळ्या सुख समाधानाच्या गोष्टीचा त्याग करून, आणि स्वतः उदाहरण राहावं सगळ्या जगासाठी विवेकी आणि सिद्ध नियमांचं.
सळसळ करणाऱ्या बदलत्या युगाच्या तालमीत स्वतः फास लावून घ्यावा स्वःच्या गळ्यात स्वावलंबनांचा वा विवेकी विचारांचा, आणि सुटका करावी ती लोभ, प्रेम ,माया ह्या सुखद वाटणाऱ्या वारेच्या झुळुकापासून.
स्वतः जगासाठी ज्ञानाची एक निर्मळ गंगा म्हणून पाप-पुण्याच्या, सुख-दुःखाच्या, न्याय -अन्याच्या दऱ्या खोऱ्यातून वाहत राहायचे आणि स्वतः अशुद्धीत वास करून जगाला शुद्ध करायचं!
दुसऱ्या कोणावरही आपली जबाबदारी आणि स्व-कष्टाची छाया पडू न देता, स्वतः एका अखंड अश्या सुर्यकिरणाप्रमाणे स्वतः त्रास सहन करून दुसऱ्याना जीवनदान देतात अशीच पूर्ण करावी आयुष्याची जिवनधारा मोक्षाच्या समुद्रापर्यंत.आणी करावी तपश्चर्या येणाऱ्या त्या लाटेची ज्याने
येणाऱ्या पिढीला होणार किमान साक्षात्कार ह्या अवाढव्य कटकटीचा आणि नगण्य परिश्रमांचा.
म्हणूनचं,ऋषीपंचमीचा हा अज्ञात अध्याय,
या दिवसाला आमची आजी फक्त तिने वर्ष भर घरी लावलेल्या फळ आणि धान्याचे सेवन करायची, शेतात पिकावर बैल तसेच अनेक मजूर कष्ट करून पीक पिकवतो म्हणून खायला असायचं ते सगळं घरचंच.
ऋषीमुनींन सारखं खाली निजायचं, जेवताना बोलायचं नाही हे सगळं कठोर नियम ऋषींन सारखं आजी पाळायची, अंघोळ करायला नदीवर जाणे त्याचबरोबर तिथल्या वाळूने ऋषींची आकृती रेखाटायची हे सगळं का ?
तर फक्त एक दिवस तरी आपण त्याचं आयुष्य स्वतः जगायचं.
त्या मागे अजून वेगळी कारण असायची पण आता ती जाणाऱ्या घडयाळाच्या टोक्याप्रेमाणे भूतकाळात विलीन होत गेली.
आणि अजूनही होणार,
अध्यायाची समाप्ती.
- भाग्येश कडू
Commenti