top of page

" आठवणींचा उजाळा "

Updated: Nov 19, 2020

" यदा कदाचित ....!"


शाळेतील स्नेहसंमेलन म्हणजे एक पर्वणीच म्हणा, आणि त्यात भुजाडे सरांच नाटक म्हणजे जणू सोने पे सुहागाच . त्यावेळी एक घोषणा ऐकायला मात्र जणु प्रत्येक जण उतावळा असायचा आणि सायंकाळी किती ही वेळ होवू देत घरी जायला तरी शेवटपर्यंत थांबायचा - प्रफुल्ल भूजाडे दिग्दर्शित , नेपथ्य गो. वा. खाडे , मुंजिक - अमरदिप खाडे , सादर करीत आहोत २ अंकी नाटक ...........



ते दिवस काहीशे वेगळेच होते . अशीच एक आठवण आपण १३ वर्षा आधी शाळेमध्ये सादर केलेल्या नाटकाची , काल यूट्यूब वर असच स्क्रोल् करता करता #यदा_कदाचित नाटक सापडलं , आणि आठवले आपले ते दिवस . सर्व क्षण जणू भर भर डोळ्यांदेखत कुंपण तोडत सैरा वैरा फिरू लागले.


आठवला तो पांडव परिवार , नायनोनेव्हर म्हणणारा युधिष्ठिर @चेतन , माश्याचा डोळा फोडणारा अर्जुन @विजय , जय_बज रंगा हुप्पा हूय्या करत अख्खं स्टेज हादरवून सोडणारा भीम @बाळू , आणि दोन लाडकी भावंड नकुल @निखिल कडू, आणि सहदेव @तीवस्कर . किस्ना धाव रे मला पाव रे , तुझ्या प्रेमाचे कित्ती गुण गाव रे , तू दर्शन आम्हाला दाव रे अशी म्हणत , श्री कृष्णाच्या धावा करणारी ती द्रौपदी @स्नेहा. कुंती म्हणजे आपली @भाग्यश्री , आणि कर्ण आमचा @राहुल.


पांडव आठवले तर कौरव आठवणार नाही अस कस होणार , शेवटी आमचाच परिवार, तर मी त्या परिवाराचा मुख्य धृतराष्ट्र या रोल साठी @अमर दादांनी शिकवले ला, प्रभुदेवा चां डान्स , कदाचित च कुणी विसरला असेल . तामंगा तामंगा करत आपली जबर छाप सोडणार्या आमच्या गांधारी ची कामगिरी अगदी वाखाणण्याजोगी बर का , नाही का रे @अमित . #दुर्योधन जातो वनवासाला... वनवासाला ... @जयवंत , त्या बीचार्याची तो गाडा ओढतांना काय हालत झाली ती त्यालाच माहिती .



कौरव परिवार आला म्हणजे शकुनी मामा ना विसरून कस चालणार , तर बोल भांजे किती पाहिजे म्हणत @सचिन ने अगदी तो ट्रेण्ड च सेट केला होता आमच्यासाठी .

आणि आमचं महाभारत म्हणजे जरा अजब गजब च म्हणा , महाभारताची झाली या भेळ , महाभारतात आला श्रावणबाळ असा म्हणत आमच्या @मंगेश ची एन्ट्री झाली , आणि मग काय विचारता .......

महाभारता चा विषय असेल आणि कृष्ण नाही ? अरेच्या अस कस ?

"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥"

हा श्लोक किती तरी दिवस पाठ करावा लागला होता बाबा @अंकुश ला.


शेवटी मैं समय हू म्हणत गांधीजी नी मारलेली ती एन्ट्री आणि तोच आमचा एक्झिट .....


(अनावधानाने कुणाचं नाव घ्यायला विसरलो असणार , तरी आठवण करून द्या . आणि आणखी काही डायलॉग्ज तुमच्या लक्षात असतील तर ते पण सांगा....)


- Rushikesh Gawande





165 views0 comments

Comments


bottom of page