RGDian

Nov 25, 20202 min

अभिप्राय (क्रांतीदर्शन : चांदस -वाठोडा)

  • ज्ञा. शा. बहुरूपी, वरुड (से. नि. शि.) - लोकमत वार्ताहर तथा समीक्षक.

'चांदस-वाठोडा' ता. वरुड येथील स्वातंत्र्यसमराचा इतिहास वाचनाचे भाग्य आदरणीय वा. शा. देशमुख गुरुजी यांच्यामुळे लाभले. स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास अखिल अभिप्राय भारत वर्षात नव्हे विश्वात जाहीर आहे. परंतु या स्वातंत्र्य युद्धात खेड्यापाड्यातून जो प्रश्न प्रतिसाद आणि सहभाग लाभला त्या सर्वाचा इतिहास आज उपलब्ध नाही. त्या काळात प्रत्येक गाव खेड्यातून प्रचंड उत्साहाने लोक सहभाग या कार्यात मिळाला. काही गावातील नव्हे तर प्रत्येक गावातील मंडळींनी आपआपल्या परीने आपला खारीचा वाटा उचललेला आहे. अशाच वाट्याचा इतिहास मा. संपादगण चांदस वाठोडा यांनी लिहिला आहे.

(Credit book- Chandas Wathoda: Krantidarshan)

स्वातंत्र्य समराचा इतिहास आणि विकास तथा प्रगती याचा सुरेख संगम या इतिहास लेखनात झाला आहे. त्यावेळी रस्ते वाहतूक याचा अभाव असतानाही महात्मा गांधीनी दिलेल्या आवाहनाला व सुचनेला प्रतिसाद देताना माहिती मिळविण्यापासून तर ती आपल्या संवगड्यापर्यंत पुरविण्याची किमया या इतिहासात आहे. स्व. आनंदराव उंद्राजी चोबितकर ज्यांना महात्माजी म्हणायचे यांचा विशेष कार्यभाग आणि आंदोलनाला सुरुवात करण्यात त्यांचा पुढाकार या इतिहासात लिहून जुन्या आद्य कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला आहे. या गावातील संग्राम सैनिकांनी केलेल्या कामगिऱ्या आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध आंदोलन करताना वापरण्यात आलेल्या युक्तीसह संपूर्ण वर्णन या इतिहासात आले आहे. या मंडळीनी घेतलेल्या बैठकी, केलेले कार्य याचे स्थळ काळासह, जुन्या नावापासून तर

आजच्या नावाच्या उल्लेखासह लिहून अगदी जिवंतपणा या इतिहासात आणलेला आहे. हा इतिहास लिहिताना कुणावर अन्याय होऊ नये, कशाची उणीव राहू नये यांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. केस कर्तनाचा व्यवसाय करताना या समरात साह्यभूत ठरणाऱ्या दळवेकरचा आवर्जून उल्लेख हे लेखनातील प्रामाणिकतेचे उदाहरण वाटते.

नदीच्या पात्रातील धुमश्चक्री, पोस्ट ऑफीस पत्रपेटीची फोडतोड, पटवारी दप्तरची जाळपोळ, प्रथमतः झालेली शाळा, रस्ते, नाटकवेडी मंडळी, संगीताचे चाहते, कलाकार आणि स्वातंत्र्य सेनानी बरोबर काही व्यक्ती विशेषाचा उल्लेख लक्षणीय आहे. ब्रिटिश पोलिसद्वारा अटक करण्याकरिता आले असता स्वातंत्र्य सेनानींच्या मनातील घुटमळ फारच बोलकी आहे.

(Credit book- Chandas Wathoda: Krantidarshan)

हा इतिहास आमच्या व पुढील पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी व स्फुर्तीदायी ठरणारा आहे. सर्व शहीद व भारत वर्षातील हयात असलेल्या सर्व संग्राम सैनिकांना विनम्र अभिवादन.

ज्ञा. शा. बहुरूपी वरुड (से. नि. शि.)

लोकमत वार्ताहर तथा समीक्षक

चांदस-वाठोडा

वरुड, ता. १३/१.२/2००६

    460
    4