top of page
4.gif
RGDian_logo.png

Welcome to Chandas Wathoda!

YB.png

RGDian Blogs

India Maharashtra Warud

Videos

चांदस - वाठोडा | Chandas Wathoda | RGDian
10:32

चांदस - वाठोडा | Chandas Wathoda | RGDian

बेलनदीच्या तीरावर चांदस - वाठोडा नावाचं जोडगोळीसारखं वसलेलं हे खेडं आहे. एकाच मायची दोन जुळी लेकरं असावी तशी ही दोन्ही गावे नदीमायच्या कुशीत दडून बसली आहे. या गावासभोवतीच मुसळखेडा, दाभी, हनुमानपेठ त्यालाच उमनपेठ असेही म्हणतात. पूर्वी तेथे रहदारी आणि मानवी वस्ती होती. अनेकवर्षे त्याचे अवशेष तेथे पहायला मिळालेत. तिथे दिसून येणारी पांढरी माती तिथे पूर्वी मानवी वस्ती असल्याची आजही साक्ष देते. आज तिथे वस्ती नाही मात्र लगतच्या मुसळखेडा या गावात वस्ती आहे. हे गाव परमहंस यशवंत माउलीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं गाव आहे. पूर्वी चांदस - वाठोडा हे गाव आणि आज नसलेली ही इतर गावेही मोर्शी तालुक्‍यात अंतर्भूत होते, जिल्हयातील तालुक्याची सरंचना बदलली तेव्हापासूनच चांदस - वाठोडा वरूड तालुक्यात समाविष्ट झालेलं आहे. तुझ्याशी जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असे दोन्ही गावाचे एकमेकात हितसंबध गुंतलेले आहे... या मातीचा टिळा ज्यांच्या माथी लागला त्यांची ललाटरेषा उजळून निघालेली आहे. याची उदाहरणेही खूप बोलकी आहेत. त्या सर्वांनी या गावाला आणि गावच्या मातीला वैभवाचे दिवस आणले आहेत. परंतू त्या सर्वांचा इथे उहापोह करायचा झाल्यास ते एक स्वतंत्र प्रकरणच होईल. अशा या मातीचा टिळा आपल्याही माथी लागलेला आहे, ही खूप मोलाची गोष्ट वाटते... - प्रमोद बाबुराव चोबीतकर ('चांदस - वाठोडा' नावाचं गाव) www.rgdian.in #rgdian | #chandaswathoda
bottom of page